Thursday, May 28, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘तू माझा होऊन ये’ अल्बम साँग प्रदर्शित

डॉ. कृणाल नंदकिशोर मेथा दिग्दर्शित ” तू माझा होऊन ये ” अल्बम साँग चा प्रदर्शन सोहोळा पुण्यातील KYTA हॉल मध्ये पार पडला. ह्या वेळी गाण्यातील कलाकार , दिग्दर्शक , निर्माते , गायक आणि तंत्रज्ञ तसेच अभिनेता सचिन गवळी , DYSP राजन जगदाळे , PSI अविनाश ढमे , ASI हनुमंत राजगे , अमालदार आशिष गायकवाड ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात पार पडला. तू माझा होऊन ये ह्या गाण्याचं दिग्दर्शन डॉ. कृणाल नंदकिशोर मेथा ह्यांनी केलं असून गाण्याची निर्मिती नंदकिशोर मेथा तर सह निर्मिती डॉ. संकेत ढेकळे ह्यांनी केली आहे. काजवा फेम अभिनेत्री सृष्टी अंबावले आणि शिवराया रं फेम अभिनेता डॉ. गौरव भोसले मुख्य भूमिकेत असून डॉ. करण राजगे, डॉ. नम्रता जगदाळे , हृषिकेश लेकावळे , अभिनंदन गायकवाड हे सह कलाकाराच्या भूमिकेत आहेत.
निलेश कटके लिखित तू माझा होऊन ये गाण्याला सुप्रसिद्ध गायक केवल वाळंज आणि सोनाली सोनावणे ह्यांनी स्वर बद्ध केलं आहे. राज शिंदे ह्यांनी नृत्य दिग्दर्शन केलं असून भागवत सोनावणे ह्यांनी रंगभूषा केली आहे. हे गाणं यूट्यूब चॅनल वर प्रदर्शित झालं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading