fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

धनुष्यबाण नेमका कुणाचा? आता 30 जानेवारीला सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना आणि धनुष्यबाणावरील केंद्रीय निवडणूक आयोगात तब्बल साडेतीन तास सुनावणी पार पडली. मात्र, शिवसेना आणि धनुष्यबाण नेमका कुणाचा? याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. सोमवारी २३ जानेवारी रोजी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. लेखी उत्तरे मिळाल्यानंतर आयोग पुढील कार्यवाही करणार आहे. विशेष म्हणजे लेखी उत्तर सादर केल्यानंतर ३० जानेवारीला निवडणूक आयोग निकाल देणार आहे.

आज ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला तर शिंदे गटाच्या वतीने महेश जेठमलानी, मनिंदर सिंह यांनी युक्तीवाद केला. जवळपास चार तास चाललेल्या या सुनावणीनंतरही शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंना मिळणार की शिंदेंना मिळणार, संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर आजही मिळाले नाही. आजच्या सुनावणीत ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक झाली. ठाकरे गटाचे देवदत्त कामत आणि शिंदे गटाचे महेश जेठमलानी यांच्यात शाब्दिक चकमक झाल्यानंतर आयोगाला मध्यस्थी करावी लागली.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरते गोठवले आणि ठाकरेंना मशाल तर शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह दिले. त्यानंतर धनुष्यबाण या शिवसेनेच्या मूळ चिन्हावर दोन्ही गटांनी दावा केला. त्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत येत्या २३ जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे आजची सुनावणी दोन्ही गटांसाठी अत्यंत महत्त्वाची होती. ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी एक तास दहा मिनिटे युक्तिवाद केला. त्यांच्यानंतर ठाकरे गटाकडून देवदत्त कामत यांनीदेखील युक्तिवाद केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading