रविवारी हिंदू जनआक्रोश मोर्चा
पुणे – सकल हिंदू समाजच्या वतीने येत्या रविवारी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकान्वये कळविली आहे.
रविवारी (२२ जानेवारी) सकाळी दहा वाजता लाल महाल येथून मोर्चाची सुरूवात होईल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून लक्ष्मी रस्त्याने मोर्चा डेक्कन परिसरातील धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पोहोचेल.
धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करावेत व त्यांची कठोर अंमलबजावणी करावी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चाची गेल्या एक महिन्यापासून तयारी सुरू आहे. हा मोर्चा अभूतपूर्व असा होईल. शहरातील राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळे या मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चात महिला आणि युवकांचा लक्षणीय सहभाग असेल. सकल हिंदू समाजाच्या ताकदीचे या निमित्ताने दर्शन होणार आहे. तेलंगणाचे आमदार राजा भैया, ‘तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, धनंजय देसाई यांचा विशेष सहभाग असणार आहे.
