सहारा क्रिककिंगडम करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत राज्यभरातून 16 संघ सहभागी
पुणे : शिवशरवी ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने आयोजित सहारा क्रिककिंगडम करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत राज्यभरातून 16 संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा 14 वर्षांखालील गटात सहारा क्रिककिंगडम व पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर 21 जानेवारी 2023 पासून रंगणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना महाराष्ट्राचा माजी रणजीपटू मानसिंग निगडे यांनी सांगितले की, स्पर्धेत पुणे, नाशिक, औरंगाबाद, नगर या शहरातून 16 संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेचा फॉरमॅट हा पुण्यातील पुना लीग व मुंबईतील कांगा लीग स्पर्धेनुसार होणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून 14 वर्षांखालील गटातील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत 22 यार्डस, रन्स क्रिकेट अकादमी, गायकवाड क्रिकेट अकादमी, पीवायसी हिंदू जिमखाना, जस क्रिकेट अकादमी, पृथ्वी स्पोर्ट्स झोन, स्पोर्ट्स स्पार्क, सहारा क्रिककिंगडम, खेल क्रिकेट अकादमी, महेश बाल भवन, क्रिकेट स्ट्रायकर्स क्रिकेट अकादमी, सीएनए, हुंडेकरी स्पोर्ट्स(नगर), नाशिक क्रिकेट अकादमी, गुरुकुल(औरंगाबाद) हे संघ झुंजनार आहेत. तसेच, ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेचे सामने 90षटकांचे होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या संघाला करंडक, पदक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, सामनावीर यांना आकर्षक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे निगडे यांनी नमूद केले.
