fbpx
Friday, April 26, 2024
BusinessLatest News

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचा एफपीओ २७ जानेवारी रोजी खुला होणार

एफपीओ इक्विटी शेअर्ससाठी पेमेंट शेड्युल
  फ्लोर किमतीवर कॅप किमतीवर
अर्ज करतेवेळी 1,556.00* 1,638.00*
नंतरच्या एक किंवा जास्त कॉल्सच्या वेळी 1,556.00 1,638.00
एकूण 3,112.00 3,276.00

जाहीर करण्यात आलेला प्राईस बँड हा प्रत्येकी १ रुपया दर्शनी मूल्य असलेल्या संपूर्ण एफपीओ इक्विटी शेअरसाठी आहे. यापैकी ५०% रक्कम अर्जाच्या वेळी देय आहे आणि उर्वरित रक्कम निर्धारित केल्यानुसार एक किंवा अधिक त्यानंतरच्या कॉलमध्ये भरली जाईल. याबाबतचा निर्णय सर्वस्वी कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे किंवा त्यांच्या अधिकृत समितीमार्फत त्यांच्या विवेकबुद्धीनुसार वेळोवेळी घेतला जाईल. 

फ्लोर/ कॅपच्या किमतीच्या ५०% समाविष्ट

टीप: ऑफरच्या रिटेल पोर्शनमध्ये रिटेल  वैयक्तिक बोलीदारांच्या बोलीसाठी प्रत्येक एफपीओ इक्विटी शेअरसाठी ६४ सूट दिली जात आहे.

 

पुणे   अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (एईएल किंवा कंपनी) शुक्रवार दिनांक २७ जानेवारी २०२३ रोजी आपला एफपीओ (फर्दर पब्लिक ऑफरिंग) खुला करणार आहे. हा एफपीओ अंशतः देय आधारावर एकूण २०,००० कोटी* रुपयांचा आहे.    *असे अनुमान लावण्यात आले आहे की एफपीओ पूर्णपणे सबस्क्राईब व अलॉट केला जाईल आणि एफपीओ इक्विटी शेअर्सचे सर्व कॉल पैसे येतील.  

या एफपीओमध्ये कंपनीच्या प्रत्येकी १ रुपया दर्शनी मूल्य असलेल्या अंशतः पेड-अप इक्विटी शेअर्सचाप्रति एफपीओ इक्विटी शेअर किमतीला (प्रीमियमसकट) फ्रेश इश्यूच्या माध्यमातून (ऑफर) समावेश आहे. या ऑफरमध्ये पात्र कर्मचाऱ्यांना सबस्क्रिप्शन करण्यासाठी एकूण ५० कोटी रुपयांपर्यंतचे एफपीओ इक्विटी शेअर्स राखून ठेवले आहेत आणि त्यांचे प्रमाण पोस्ट-ऑफर पेड-अप इक्विटी कॅपिटलच्या ५% पेक्षा जास्त असणार नाही.

 

ऑफरमधील रिटेल पोर्शनमध्ये बोली लावण्यासाठी रिटेल वैयक्तिक बोलीदारांसाठी प्रत्येक एफपीओ इक्विटी शेअरवर ६४ रुपयांची रिटेल सूट देण्यात आली आहे.

 

प्राईस बँड प्रत्येकी १ रुपया दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी समभागासाठी ३११२ रुपये ते ३२७६ रुपये निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी ४ एफपीओ इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर ४ एफपीओ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावता येतील. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोलीची तारीख बोली/ऑफर खुली होण्याच्या तारखेच्या आधीच्या एक कामकाजाचा दिवसाची तारीख असेल. एफपीओ ऑफर मंगळवार ३१ जानेवारी २०२३ रोजी बंद होईल. युपीआय मॅन्डेट बोली/ऑफर बंद होण्याच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता संपेल.

रिटेल गुंतवणूकदारांसाठी रिटेल पोर्शनमध्ये प्रत्येक एफपीओ इक्विटी शेअरवर ६४ रुपयांची सूट दिली जाईल आणि ही सूट दिनांक १८ जानेवारी २०२३ रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा एक भाग मानली गेली पाहिजे आणि आरएचपीसोबत वाचली गेली पाहिजे.

अदानी एंटरप्रायझेसने एफपीओमधून जी रक्कम उभारली जाईल त्यापैकी १०८६९ रुपये आपल्या काही उपकंपन्यांच्या भांडवली खर्चाच्या आवश्यकतांसाठी खर्च करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.  हे खर्च ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टिमशी संबंधित काही प्रकल्प, काही वर्तमान विमानतळ सुविधांच्या सुधारणा कामांसाठी आणि ग्रीनफील्ड एस्क्प्रेसवेच्या बांधकामाशी संबंधित असणार आहेत. कंपनी स्वतः आणि त्यांच्या तीन उपकंपन्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड, अदानी रोड ट्रान्सपोर्ट लिमिटेड आणि मुंद्रा सोलर लिमिटेड यांच्या काही कर्जांची संपूर्ण किंवा अंशतः परतफेड करण्यासाठी ४१६५ रुपये वापरण्याचा देखील अदानी एंटरप्रायझेसचा प्रस्ताव आहे.  उर्वरित रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट कामांसाठी वापरली जाईल.

या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमार्फत प्रस्तुत केले जात असलेले एफपीओ इक्विटी शेअर्स हे शेअर बाजारांमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत.

या ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स पुढीलप्रमाणे आहेत – आयसीआयसीआय सिक्योरिटीज लिमिटेड, जेफरीज इंडिया प्रायवेट लिमिटेड, एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड, एक्सिस कॅपिटल लिमिटेड, बीओबी कॅपिटल मार्केट्स लिमिटेड, आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स अँड सिक्योरिटीज लिमिटेड, जेएम फाइनेंशियल लिमिटेड, आयआयएफएल सिक्योरिटीज लिमिटेड, मोनार्क नेटवर्थ कॅपिटल लिमिटेड आणि इलारा कॅपिटल (इंडिया) प्रायवेट लिमिटेड.

ही ऑफर सेबी आयसीडीआर नियम क्रमांक १५५ नुसार देण्यात येत आहे.  ही ऑफर सेबी आयसीडीआर नियमांच्या नियम १२९(१) नुसार आणि बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत देण्यात येत आहे ज्यामध्ये नेट ऑफरचा जास्तीत जास्त ५०% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील. सेबी आयसीडीआर नियमांनुसार कंपनी बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी ६०% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईल, यासाठी सेबी आयसीडीआर नियमांनुसार अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या वर वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून प्राप्त होणे आवश्यक आहे. अंडर-सब्स्क्रिप्शन किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास उरलेले एफपीओ इक्विटी शेयर्स अँकर गुंतवणूकदारांना वाटून देण्यात आलेले इक्विटी शेयर्स वजा करून नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील. क्यूआयबी पोर्शनपैकी ५% (अँकर इन्व्हेस्टर पोर्शन वगळता) हे विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल. यासाठी इश्यू किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे. सेबी आयसीडीआर नियम १२९(१) नुसार या नेट ऑफरमधील कमीत कमी १५% भाग क्वालिफाईड नॉन-इन्स्टिट्यूशनल बिडर्सना (“नॉन-इन्स्टिट्यूशनल पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील त्यापैकी एक तृतीयांश भाग २,००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि १०,००,००० रुपयांपर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी आणि यापैकी दोन तृतीयांश भाग १०,००,००० रुपयांपेक्षा जास्त अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवण्यात आला आहे, ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त पात्र बोली आल्या तर प्रत्येक सब-कॅटेगरीमधील सबस्क्राईब न करण्यात आलेला पोर्शन नॉन-इन्स्टिट्यूशनल बोलीदारांच्या दुसऱ्या सब-कॅटेगरीमधील अर्जदारांना वाटून दिले जातील. हे सेबी आयसीडीआर नियमांप्रमाणे केले जाईल. सेबी आयसीडीआर नियमांनुसार नेट ऑफरपैकी जास्तीत जास्त ३५% भाग रिटेल व्यक्तिगत बोली लावणाऱ्यांसाठी उपलब्ध करवून दिला जाईल. यासाठी ऑफर किमतीपेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे. सर्व संभाव्य बिडर्स बोली लावणारे सर्व (अँकर इन्वेस्टर्सव्यतिरिक्त) अप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या इश्यूमध्ये सहभागी होतील यासाठी त्यांना त्यांच्या  खात्यांची (युपीआय यंत्रणा वापरणाऱ्या बिडर्ससाठी युपीआय आयडी) माहिती देणे आवश्यक आहे ज्यामध्ये जे सेल्फ सर्टिफाईड सिंडिकेट बँकांकडून (“एससीएसबी”) किंवा प्रायोजक बँकेकडून (जे लागू असेल त्याप्रमाणे) युपीआय यंत्रणेअंतर्गत संबंधित बोली रकमा ब्लॉक केल्या जातील. अँकर इन्वेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही.

अधिक तपशीलवार माहितीसाठी आरएचपीचे पान क्रमांक ६९८ वर “ऑफर प्रोसिजर” वाचावे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading