Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात हिंजवडी येथे कराटे स्पर्धेच्या उद्घाटन दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागली. लक्षात येताच वेळीच आग विझवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना रविवारी सकाळी हिंजवडी येथे घडली.

याबाबत स्वतः सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली आहे. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील हिंजवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कराटे स्पर्धेचे उद्घाटन करीत असताना अनवधानाने साडीने पेट घेतला. पण वेळीच ती आग आटोक्यात आणण्यात आली.

आमचे हितचिंतक, नागरीक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांना माझी विनंती आहे, की मी सुरक्षित असून कृपया कुणीही काळजी करु नये. आपण दाखवित असलेले प्रेम, काळजी माझ्यासाठी मोलाचे आहे. आपणा सर्वांचे मनापासून आभार.
धन्यवाद, असा संदेश खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading