Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNESports

संजय काकडेंच्या हस्ते हिंदकेसरी अभिजीत कटकेचा सत्कार

पुणे : हिंदकेसरी चा किताब पटकावणाऱ्या अभिजीत कटके याचा आज भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार संजय काकडे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी अभिजीतला दीड किलो चांदीची गदा भेट देण्यात आली.

अभिजीत कटके याने हिंदकेसरी किताब मिळवून त्याच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. त्याने यापूर्वी महाराष्ट्र केसरीचा किताब देखील पटकावला आहे.

भारतीय शैली कुस्ती महासंघाने हैदराबाद, तेलंगणा येथे अखिल भारतीय ५१ वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. या मानाच्या स्पर्धेत अभिजीत कटके याने हिंदकेसरी चा किताब पटकवला. अंतिम सामन्यात पुण्याच्या जिगरबाज कुस्तीपटू अभिजीत कटके याने हरियाणाच्या सोमवीर वर विजय मिळवला.

आज पुणे शहरातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात हिंदकेसरी अभिजीत कटके याचा संजय काकडे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी अभिजीत कटकेची ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतिषबाजी करीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी नगरसेवक शंकर पवार, राहुल भंडारे, धीरज घाटे, हेमंत रासने, योगेश समेळ, तुषार पाटील, दिलीप काळोखे, ओंकार कदम, मनीष साळुंखे, समीर शेंडकर, केदार मानकर, महेश सकट, वसंत चौगुले, गणेश यादव, प्रशांत मते आणि मोठ्या संख्येने पुणेकर नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading