Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

अजितदादा थोडक्यात वाचले; लिफ्ट कोसळली

पुणे : राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार काल पुण्यात होते यावेळी त्यांनी अनेक ठिकाणी उद्घाटने केली. दरम्यान काल घडलेल्या एका धक्कादायक घटनेची माहिती त्यांनी आज बारामती येथील एका सभेवेळी दिली, ते म्हणाले थोडक्यात वाचलो अन्यथा आज श्रद्धांजली वाहायला लागली असती.

काल १४ तारीख होती मी एका हॉस्पिटलचे उद्घाटन केले, त्यावेळी तिस-या मजल्यावर पाहणी केली त्यानंतर डॉक्टरांनी चौथ्या मजल्यावर लिफ्टने जाऊ असे सांगितले. त्यांचे वय जास्त असल्यामुळे लिफ्टमध्ये बसलो जायला लागलो. तेव्हा अचानक लिफ्ट बंद झाली, लाईट गेली आणि चौथ्या मजल्यावरून धाडकीने लिफ्ट खाली कोसळली थोडक्यात वाचलो नाहीत तर आज नक्कीच श्रद्धांजलिचा कार्यक्रम घ्यावा लागला असता असे अजित पवार यांनी सांगितले.

दरम्यान आज अजित पवार बारामती दौ-यावर आहेत. त्यांनी बारामती तालुक्यातील अनेक गावांमध्ये विकास कामांचा आढावा घेतला, तर काही कामांचे भूमिपूजन केले, त्यावेळी हा किस्सा सांगितला. आज बारामती मधील वाढत्या गुन्हेगारीवरदेखील अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. तर पोलिसांना खडे बोल सुनावले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading