इनर व्हॉईस कडून पुण्यात अनोखे “विपश्यना मेडिटेशन वर्कशॉप”
जॅकफ्रूट ट्री, भोसले नगर येथे १ ते ४ फेब्रुवारी रोजी होणार आयोजन. आत्म-जागरूकता, आत्मविश्वास, सहानुभूती सारखे गुण विकसित करण्यासाठी तसेच भावनांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि चिंतनशील आणि ज्ञानवर आधारित विपश्यनेची अनोखी पद्धती प्रस्तृत करण्यासाठी इनर व्हॉईस ही संस्था नेहमीच वचनबद्ध आहे. अत्यंत आदरणीय मानल्या जाणार्या तिबेटी लामा यांच्या विद्यार्थिनी अरुणा गेल्या ८ वर्षांपासुन या कार्यशाळेचे आयोजन करत आहेत. अरुणा मानतात की “मनाचा व्यायाम शरीराच्या व्यायामाइतकाच महत्त्वाचा आहे. नियमित विपश्यना ध्यान सराव ही मानसिक आणि भावनिक उपचारांची गुरुकिल्ली आहे आणि ती जडलेल्या सवयींमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणू शकते,” तर तुम्ही देखील १ ते ४ फेब्रुवारी २०२३ दरम्यान आयोजित होणार्या या चार दिवसीय कार्यशाळेत सामील व्हा. स्थळ: जॅकफ्रूट ट्री, ३७ भोसले नगर, पुणे – ४११००७ वेळ: सकाळी ७.१५ ते ८.३० नोंदणीसाठी कृपया आपले नाव, संपर्क क्रमांक आणि व्यवसायासह ९८२२०५५६३३ या क्रमांकावर व्हॉट्सअॅप द्वारे संपर्क करा.
