रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने गरजू व वंचित घटकातील महिलांना साड्या वाटप
पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघाच्या वतीने भव्य शाखा उद्घाटन व गरीब व वंचित घटकातील महिलांना साड्या वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला .यावेळी युवक आघाडीचे पशिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष निलेश भाऊ अल्हाट यांच्या वाढदिवस भवानी पेठ येथे साजरा करण्यात आला .यावेळी नवीन पदाधिकारी व कार्यकर्ते यांना नियुक्ती पत्र देण्यात आले .या कार्यक्रमाचे आयोजन कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे अध्यक्ष संदीप धांडोरे यांनी केले होते .शाखा अध्यक्षपदी निलेश जगताप यांची निवड करण्यात आली .या भव्य शाखा उद्घाटन व गरजु महिलांना साड्या वाटप कार्यक्रमास शहराध्यक्ष शैलेश चव्हाण, पश्चिम महराष्ट्र कार्याध्यक्ष निलेश आल्हाट,सरचिटणीस महिपाल वाघमारे लियाकत शेख सुन्नाबी शेख मंगल राजगे सुरेश यादव शंशाक माने रविंद्र कांबळे अक्षय गायकवाड अनिल गायकवाड रितीका धांडोरे कार्यक्रम आयोजक संदिप धांडोरे अध्यक्ष पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघ व पुणे शहरातील महिला युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
