Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

निळे फेटे घालून आंबेडकरी महिलांनी केले राजमाता जिजाऊंना अभिवादन

पुणे : राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुणे शहरातील विविध पक्ष संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या आंबेडकरवादी महिला पदाधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या लाल महल येथील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला तसेच बाल शिवबा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने रिपब्लिकन युवा मोर्चा, वंचित बहुजन आघाडी ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, आझाद समाज पार्टी, दलित पॅंथर यांसह विविध पक्ष संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांनी निळे फेटे परिधान करून चळवळीतील नेते व भीमा कोरेगाव नियोजन समिती अध्यक्ष राहुल दादा डंबाळे यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित मान्यवरांच्या समवेत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व याप्रसंगी शहरात सुरू असलेले महापुरुषांवरून जातीपातीचे राजकारण मोडीत काढण्याचा संकल्प जाहीर केला .
राजमाता जिजाऊ या सर्वच घटकातील सर्वच समाजातील व सर्वच कालखंडातील महिला व सर्व समाजासाठी कायम आदर्शवत राजमाता आहेत त्यांचा आदर्श घेऊन पुढील वाटचाल करणार असल्या

याप्रसंगी सुवर्णा ताई डंबाळे ,रजनीताई त्रिभुवन ,विशाखाताई गायकवाड ,स्वातीताई गायकवाड प्रियदर्शनी निकाळजे, अर्चना ताई केदारी, अनिता ताई धीमधिमे, स्नेहा ताई माने, शर्वरी ताई गोतारणे , मंगल ताई सोनावणे, मीनाज ताई मेमन, सुमती ताई आढाव, आरतीताई साठे रेखाताई चौरे यासह पुणे शहरातील महिला ,युवक व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन केले .

निळे फेटे घालून आंबेडकरी महिलांनी केले राजमाता जिजाऊंना अभिवादन
पुणे : राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुणे शहरातील विविध पक्ष संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या आंबेडकरवादी महिला पदाधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या लाल महल येथील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला तसेच बाल शिवबा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने रिपब्लिकन युवा मोर्चा, वंचित बहुजन आघाडी ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, आझाद समाज पार्टी, दलित पॅंथर सहभागी होते .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading