Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

मानसिक व शारिरीक स्वास्थ्यासाठी एक लाख युवक येणार एकत्र

पुणे : आजच्या स्पर्धेच्या युगात वेगवेगळ्या क्षेत्रात अग्रेसर होण्यासाठी मानसिक शक्तीची आवश्यकता आहे. मानसिक शक्ती वाढवून आणि व्यसनमुक्त राहून स्वत:ची व देशाची प्रगती साधण्याची प्रेरणा मिळावी, याकरिता एक लाख युवक पुण्यामध्ये एकत्र येणार आहेत. आर्ट आॅफ लिव्हिंग फाऊंडेशनसह विविध नामवंत शैक्षणिक संस्थांच्या पुढाकाराने एज्युयूथ मीट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे.

तरुणांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी शिक्षण क्षेत्रातील दिग्गज मंडळी एकत्र येणार असून शनिवार, दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्याकाळी ६ ते ९ यावेळेत कोथरुडमधील सूर्यकांत काकडे फार्म येथे हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी आर्ट आॅफ लिव्हिंग चे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे हे उपस्थिांना मार्गदर्शन करणार आहेत. नावनोंदणीस सुरुवात झाली असून एड्यूयुथ च्या अधिकृत हेल्पलाईन च्या ८४४७८०७८३७ या नंबर वर संपर्क साधून क्यू आर कोड स्कॅन करुन नोंदणी करायची आहे.

कार्यक्रमाची आशिया बुक आॅफ रेकॉर्डस मध्ये नोंद होण्यास प्रयत्न करण्यात येणार असून उपस्थित युवक व्यसनमुक्तीची शपथ घेणार आहेत. शपथ कार्यक्रमास एक लाख विद्यार्थी आणि दहा हजार शिक्षणतज्ञ उपस्थित राहणार आहेत. आर्ट आॅफ लिव्हिंग फाऊंडेशन, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सिंबायोसिस, भारती विद्यापीठ, एमआयटी, डॉ.डी.वाय.पाटील संस्था, सूर्यदत्ता, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, एसपी, सीओईपी अशी महाविद्यालये, एनआरडीसीएम आणि एमआरडीसी यांसारख्या संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत. मानवी मूल्ये आणि व्यसनमुक्त भारत या गोष्टींवर सदर कार्यक्रमात भर असणार आहे.आर्ट आॅफ लिव्हिंग शैक्षणिक संस्था कार्यक्रम संचालक हिमांशू नगरकर म्हणाले, कार्यक्रमात सहभागी सभासदांना सर्व सहभागी संस्थांनी अधिकृत केलेले ई प्रमाणपत्र देण्यात येईल. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या बरोबर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आणि परीक्षा, अभ्यास याचा ताण घालवण्यासाठी विविध प्रात्यक्षिके देखील गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार आहेत.

एनएसएस राज्य सल्लागार समितीचे राजेश पांडे म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या युगात वेगवेगळ्या क्षेत्रात अग्रेसर होण्यासाठी मानसिक शक्तीची आवश्यकता आहे, तसेच या दबावाखाली व्यसन लागण्याची शक्यताही खूप आहे. त्यामुळे या कार्यक्रमात सहभागींना मानसिक शक्ती वाढवून आणि व्यसनमुक्त राहून स्वत:ची व देशाची प्रगती साधण्याची प्रेरणा मिळेल, असा कार्यक्रम आखला आहे. हीच भावना नव्या शिक्षण धोरणात अपेक्षित आहे.
आर्ट आॅफ लिव्हिंगचे राजय शास्त्रेय म्हणाले, विविध विषयांवरील जागतिक तज्ञ मंडळींच्या आॅनलाईन व्याख्यानाची लिंक कार्यक्रमातील सहभागी सभासदांना दिली जाईल. त्याद्वारे ते सध्या जागतिक पातळीवरील तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊ शकतील. हा कार्यक्रम महाराष्ट्राबाहेरील महाविद्यालयांसाठी मेटाव्हर्स वर प्रक्षेपित केला जाईल. सहभागासाठी क्यू आर कोड स्कॅन करुन तरुणांनी नोंदणी करायची आहे. अधिक माहिती साठी व नोंदणीसाठी एड्यूयुथ च्या अधिकृत हेल्पलाईन च्या ८४४७८०७८३७ या नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading