fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन

पुणे :  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताह २०२३ चे उद्घाटन करुन मोटारसायकल फेरीला शुभारंभ करण्यात आला. ११ ते १७ जानेवारी या कालावधीत हा सप्ताह राबवण्यात येत आहे.

यावेळी पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले, अमर देसाई व युवराज पाटील उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केवळ सप्ताहापुरते मर्यादित न ठेवता वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्राचा शोध घेऊन त्याची दुरुस्ती करावी. देशात मोठ्या प्रमाणात रस्ते विकासाची कामे सुरू असताना अपघातांचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्यामुळे नागरिकानी प्रवास करताना सीटबेल्ट व हेल्मेटचा वापर करण्यासह वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले.

मोटरसायकल फेरीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरु होऊन पुढे कॅम्प, पुलगेट, स्वारगेट, सारसबाग, टिळक रोड, लकडी पुल, फर्ग्युसन महाविद्यालय रोड, कृषी महाविद्यालय, संचेती हॉस्पिटल मार्गे परिवहन कार्यालय येथे या फेरीचा समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading