fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

वसंतोत्सव विमर्श उपक्रमात ‘अष्टपदी’ या संगीतविषयक विशेष कार्यशाळेचे आयोजन

पुणे  : १६ व्या वसंतोत्सव अंतर्गत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ‘विमर्श’ या विशेष सांगीतिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. १२ व्या शतकातील कवी जयदेवाच्या ‘गीत गोविन्द’ या संस्कृत काव्यातील आठ चरणांच्या कविता अर्थात ‘अष्टपदी’ या आज हिंदुस्थानी संगीतातील दुर्मिळ गीतप्रकारावर ही कार्यशाळा आधारित असून रविवार दि. १५ जानेवारी, २०२३ रोजी सायं. ५:३० ते ९ या वेळेत टिळक रस्त्यांवरील हिराबाग चौकातील ज्योत्स्ना भोळे सभागृह या ठिकाणी पार पडेल. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणा-यास प्राधान्य या तत्त्वावर कार्यक्रमासाठी प्रवेश देण्यात येईल.

कार्यशाळेच्या प्रथम सत्रात ग्वाल्हेर परंपरेतील संस्कृत अष्टपदीच्या दुर्मिळ बंदिशींचे गायन होईल. तरुण पिढीतील गायक केयूर कुरुलकर, विश्वेश सरदेशपांडे, माधवी चक्रदेव, स्वानंदी सडोलीकर, आदिश्री पोटे, कौशिकी कलेढोणकर हे कलाकार गायन सादरीकरण करतील. त्यांच्या अष्टपदी गायनास सौमित्र क्षीरसागर (संवादिनी) व पार्थ ताराबादकर (तबला) हे साथ करतील. तर दुसऱ्या सत्रात विख्यात संगीतज्ज्ञ डॉ. चैतन्य कुंटे यांची प्रात्यक्षिक कार्यशाळा होईल. यामध्ये अष्टपदीच्या दुर्मिळ बंदिशींचा अनमोल ठेवा विद्यार्थ्यांना शिकता येईल

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading