Thursday, August 27, 2026
ENTERTAINMENTLatest News

अद्वैतला कळेल का नेत्राच्या दिव्यशक्तीबद्दल?

आपल्याला नेहमीच भविष्यकाळात काय घडणार या विषयी कुतूहल असतं आणि भविष्य आपल्याला दिसू लागलं तर त्याचं आश्चर्यच वाटेल. अगदी असंच सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील नेत्राच्या आयुष्यात घडतंय. नेत्रा भविष्यात जे घडणार आहे, त्याबद्दल बोलते कारण आई त्रिनयना देवीचं वरदान तिला लाभलाय. ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे, आता ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे. नेत्रा राजाध्यक्षांचं घर सोडून जाते पण ती बसमध्ये चढणार एवढ्यात तिला संकेत मिळतो, कन्स्ट्रक्शन साईटवर अव्दैतचा अपघात होणार आहे. नेत्रा जीवाची बाजी लावून अव्दैतला वाचवते, तेव्हा शेखरची खात्री पटते, की नेत्राला अव्दैतपासून दूर करून आपण चूक करत आहोत. शेखर नेत्राला घरी घेऊन येतो. शेखर घरी सगळ्यांना सांगतो, की नेत्राला भविष्यातील घटना दिसतात त्यामुळे सगळे आश्चर्यचकीत होतात.  आता नेत्राच्या दिव्यशक्तीबद्दल कळल्यावर काय असेल अद्वैतची प्रतिक्रिया? हे पाहण्यासाठी पाहायला विसरू नका “सातव्या मुलीची सातवी मुलगी” सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading