Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

रेश्मा खिलारे यांना सावित्रीची लेक पुरस्कार

पुणे:लोकशाहीर जनकल्याण सेवा समिती नवी दिल्ली यांच्या कडून सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त दिला जाणारा सावित्रीची लेक 2023 हा पुरस्कार बावधन गावच्या मा. उपसरपंच रेशमा विशाल खिलारे यांना देण्यात आला. या पुरस्काराच वितरण तीन जानेवारी रोजी करण्यात आले.रेश्मा खिलारे यांनी सामाजिक क्षेत्रात तसेच साहित्य, कला, क्रीडा व राजकीय क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. सरकारी विभाग व शासकीय कामात त्यांचे योगदान आहे. या कार्याची दखल घेत त्यांना लोकशाहीर जनकल्याण सेवा समिती नवी दिल्ली यांच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्काराने सन्मानित केल्याने बावधन गावांतील नागरिकांकडून रेश्मा यांचं कौतुक होत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन दिल्लीच्या न्यु महाराष्ट्र सदन कस्तुरबा गांधी मार्ग नवी दिल्ली येथे पार पडला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मा.आमदार राम गुंडीले, सह्याद्री वेल्फेर असोसिएशनचे अरुण देहेरकर, समिती सचिव विक्रम सोळसे यांच्या उपस्थित देण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading