राज ठाकरे यांनी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले
पुणे:सलग चार वेळा नगरसेवक राहिलेल्या, महापालिकेतील विविध समित्यांसह महापौर पदही भूषवलेल्या आणि कसबा विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार ‘मुक्ता टिळक’ यांचे निधन झाले आहे.त्यांच्या मागे पती शैलेश, मुलगी चैत्राली, मुलगा कुणाल, जावई, सून असा परिवार आहे.
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी राज ठाकरे म्हणाले, “मी मागील आठवड्यात पुण्यातच होतो. मी ताईंना काही महिन्यांपूर्वी येथेच भेटलो’ असल्याची आठवण राज ठाकरे यांनी यावेळी सांगितली.
तर मध्यंतरी विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीच्या मतदानला स्वतःहून गेल्या होत्या. मला मतदानाला जायच असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. यावेळी राज ठाकरेंनी मुक्ता टिळक यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी शैलेश टिळक, कुणाल टिळक, रोहित टिळक आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.
,
