Tuesday, June 16, 2026

Day: January 8, 2023

Latest NewsPUNE

स्वर झंकार महोत्सवात व्हायोलिन – सतार जुगलबंदीत रसिक दंग 

पुणे : गुलाबी थंडीच्या साथीने सादर होणारे गावती, पिलू, देस असे विविध राग,  व्हायोलिन व सतारच्या सुरावटी आणि त्यानंतर सादर

Read More
Latest NewsPUNE

चक्रीभजनाद्वारे श्री विठ्ठल भक्तीच्या दिव्य आध्यात्मिक आनंदाची प्रचिती

पुणे : टाळ, मृदुंग, दिमडी, चिपळ्यांंचा निनाद आणि एका विशिष्ट चालीमध्ये सूर–ताल लयीसह केलेल्या विठ्ठल नामाच्या जयघोषातून श्रोत्यांना दिव्य आध्यात्मिक आनंदाची प्रचिती आली. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे पुणे विभागीय कार्यालय (आयसीसीआर) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातर्फे शुक्रवारी (दि. 6) विद्यापीठातील संत नामदेव सभागृहात चक्रीभजनाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुबाबा महाराज औसेकर आणि त्यांच्या शिष्यांनी चक्रीभजन सादर केले. चक्रीभजनाचा हा अनोखा प्रकार पाहण्यासाठी तसेच भक्तीरसाची अनुभूती घेण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूकर यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या पुणे विभागीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या सल्लागार समितीचे सदस्य ज्येष्ठ गायक पंडित सुहास व्यास आणि मुकुंद तापकीर तसेच आयसीसीआरच्या विभागीय निदेशक निशी बाला उपस्थित होत्या. चक्रीभजनाच्या परंपरेविषयी माहिती देऊन देगलूरकर म्हणाले, औसेकर घराण्याने चक्रीभजनाची परंपरा नुसती जपली नाही तर वृद्धींगतही केली आणि अनेकांना विष्णुभक्तीचे वेड लावले. चक्री हे विष्णूचे विशेषण आहे आणि ते विठोबापर्यंत येऊन पोहोचते. अभंगाद्वारे विठोबाची भक्ती करणे, त्याचे स्तवन करणे ते आपल्यासमोर मांडता येते. पंडित सुहास व्यास म्हणाले, आम्ही गायनाच्या क्षेत्रात असलो तरी आमच्या घराण्यात संत परंपरा आहे. संगीताच्या क्षेत्रातही भक्ती असतेच. उल्हास पवार म्हणाले, भारतीय उपखंडामध्ये आध्यात्मिक संस्कृती नांदते आहे. ही आध्यात्मिक संस्कृती जतन करणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे मोलाचे कार्य आयोजक संस्थांच्या माध्यमातून होत आहे, ही गौरवाची गोष्ट आहे. पांढराशुभ्र सदरा, धोतर, गळ्यात नारदीय वीणा, हातात चिपळ्या, डोक्यावर कृपाप्रासादिक हिरवा फेटा, पायात चाळ, कमरेला हिरवी शाल, गळ्यात तुळशीहार, मुंडासे, पाठीवर फुलांचा शेला, डोक्यावर फुलांचा नागफणारूपी मुकुट असा पेहराव करून गुरुबाबा महाराज औसेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह विठ्ठल चरणी आपली चक्रीभजनाची सेवा समर्पित केली. गुरुपरंपरेचे ध्यान करून चक्रीभजनाला सुरुवात करण्यात आली. मध्यभागी गुरुबाबा महाराज औसेकर आणि त्यांच्या भोवती गोलाकार रचनेतील त्यांच्या शिष्यांनी वैविध्यपूर्ण पद्धतीने पाऊले खेळत, विठ्ठलाचा जयजयकार करत, नृत्य–गायनासह 14 अभंग, भजने सादर केली. यात मालोपंत, श्री तुकाराम महाराज, श्री नामदेव महाराज, श्री गुरुगुंडा महाराज, श्री वीरनाथ महाराज, श्री रामकृष्ण महाराज यांच्या अभंगांचा समावेश होता. ‘हेची मागतो तुजला, कृपादान गा विठ्ठला, नाम तुझे असो वदनी, नको विसरो दिन रजनी‘ या वीरनाथ महाराज रचित अभंगाने चक्रीभजानाची सांगता झाली.  

Read More
Latest NewsPUNE

पतित पावन संघटनेच्या वतीने चार्ली हेब्दो कार्यालयावरील हल्ल्याचे स्मरण आणि मृतांना श्रद्धांजली

  चार्ली हेब्दो कार्यालयावरील हल्लेच्या घटनेला  ७ वर्षे पूर्ण पुणे : पतित पावन संघटना पुणे शहराच्या वतीने फ्रान्समधील व्यंगचित्र साप्ताहिक चार्ली हेब्दो च्या पॅरिस

Read More