Wednesday, June 17, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRATOP NEWS

आमदार रोहित पवार म्हणतात माऊली… ‘वेड’ लै भारी!

बॉलिवूड अभिनेता रितेश आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा ‘वेड’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. रितेशचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. तर जिनिलियाने देखील या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे.  या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीमध्ये स्थान मिळविले आहे. ‘वेड’ ला सामान्य प्रेक्षकांपासून समीक्षकांची भरभरून दाद मिळाली आहे, आता यात राजकीय नेत्यांचीही भर पडली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत हा चित्रपट पाहिला आणि माऊली… ‘वेड’ लै भारी! अशा शब्दांत चित्रपटाचे कौतुक केले आहे. 

आमदार रोहित यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की, माऊली… ‘वेड’ लै भारी! रितेश देशमुख जी यांनी दिग्दर्शित केलेला #वेड हा सिनेमा कार्यकर्त्यांसोबत बघण्याचा योग आज जुळून आला. एक हळूवार आणि भावस्पर्शी प्रेमकहाणी रितेश-जिनिलीया या जोडीने खरोखरंच अप्रतिम साकारलीय. त्यांच्या या चित्रपटाला माझ्या मनापासून शुभेच्छा!
तुम्हीही अवश्य बघा!

दरम्यान, वेड हा चित्रपट शुक्रवारी ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला असून पहिल्या पाच दिवसांत 15 कोटींहून अधिक कमाई केली आहे.  वेड या चित्रपटात जिनिलिया आणि रितेश सोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी, जिया शंकर, शुभंकर तवडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानहा एका गाण्यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसत आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading