fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

राज्यस्तरीय आंतरशालेय, महाविदयालयीन विज्ञान महोत्सव शनिवारी 

पुणे : प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, विज्ञान विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहयोगाने ‘चौथ्या जाधवर सायन्स फेस्टिव्हल’ या राज्यस्तरीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, दिनांक ७ जानेवारी रोजी सकाळी नºहे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुलात महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळाच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे. महोत्सवामधील स्पर्धा शालेय, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय अशा तीन गटात होणार आहे. सायन्स आणि टेक्नॉलॉजी या मुख्य संकल्पनेंंतर्गत डिझास्टर मॅनेजमेंट, वेस्ट टू वेल्थ, सायंटिफिक मॉडेल फॉर बेटर फ्युचर, पोल्युशन इटस् इफेक्ट अ‍ँड रेमिडीज, ह्युमन बायोलॉजी अ‍ँड गेल्थ, आॅटोमेशन इन अ‍ॅग्रीकल्चर, क्लिन अ‍ँड ग्रीन इन्व्हार्नमेंट, क्लायमेट क्रायसिस अ‍ँड सोल्युशन, मेडिकल टेक्नॉलॉजी अशा विविध संकल्पनांवर विद्यार्थी प्रकल्पाचे सादरीकरण करणार आहेत.
अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, ‘जाधवर सायन्स फेस्टिव्हल’ या  राज्यस्तरीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांसाठी हा एक अभिनव व आदर्श उपक्रम असणार आहे. या महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व्यासपीठ मिळणार आहे. विज्ञान विषयाची विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी, यासाठी विविध उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात येतात. स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading