Tuesday, June 16, 2026
Latest NewsSports

वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा ५० दिवसाचा काउन्ट डाऊन उद्या सुरु होणार

पुणे : पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) आणि पुणे महानगरपालिका यांच्या वतीने ८४ व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या काउन्ट डाऊन ५० उद्या पासून सुरु होणार आहे. मंगळवार दिनांक ३ जानेवारी रोजी शिवाजीनगरमधील पीडीएमबीए स्पोर्टस काॅम्प्लेक्स येथे सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप उपस्थित राहणार आहे. अशी माहिती पीडीएमबीएचे सचिव रणजीत नातु यांनी दिली.

यावेळी कार्यक्रमाला पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिरीष बोरालकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह, पी डीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

रणजीत नातु म्हणाले, १९९७ मध्ये ही स्पर्धा पुण्यात झाली होती त्या नंतर २५ वर्षांनी हा मान पुन्हा पुण्याला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स, थॉमस चषक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील पदक विजेते भारतीय संघ सदस्य स्पर्धेत घेणे अपेक्षित आहे, यामुळे स्पर्धेची उंची वाढेल. पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल, लक्ष्य सेन, सात्विक साईराज, चिराग शेट्टी, एच.एस. प्रणॉय, किदाम्बी श्रीकांत, यासह अनेक नामांकित खेळाडू या स्पर्धेत आपले कौशल्य दाखवणार आहेत. पीडीएमबीए यंदा अमृत महोत्सव साजरा करत आहे. पीडीएमबीए ला २०२१ मध्ये ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading