Thursday, May 28, 2026
Latest NewsSports

तिसऱ्या महिला टी -20 क्रिकेट स्पर्धेत हेमंत पाटील रॉयल्स संघाला विजेतेपद

पुणे :रॉक 27 यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या महिला टी -20 क्रिकेट स्पर्धेत हेमंत पाटील रॉयल्स संघाने चंद्रोज् संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले.

रॉक 27 क्रिकेट अकादमी मैदान, लोणी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सायली लोणकरच्या तुफान फलंदाजीच्या जोरावर हेमंत पाटील रॉयल्स संघाने चंद्रोज् संघाचा 32 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. पहिल्यांदा खेळताना हेमंत पाटील रॉयल्स संघाने 20 षटकांत 8 बाद 163 धावा केल्या. सायली लोणकरने केवळ 36 चेंडूत 9 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 70 धावा करून संघाचा डाव भक्कम केला. पुनम खेमनारने 34 धावा करून सायलीला सुरेख साथ दिली. 163 धावांच्या आव्हानाचा सामना करताना पुनम खेमनार व प्रज्ञा वीरकरच्या अचूक गोलंदाजीने चंद्रोज् संघाचा डाव 20 षटकांत 5 बाद 131 धावांत रोखला. साक्षी वाघमोडेने नाबाद 72 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. सायली लोणकर सामनावीर ठरली.

स्पर्धेतील विजेत्या हेमंत पाटील रॉयल्स संघाला करंडक व 41 हजार रुपये तर उपविजेत्या चंद्रोज् संघाला 31 हजार रुपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण भारतीय टेनिस क्रिकेट खेळाडू केऊष्णा सातपूते विशाल भिलारे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम फेरी 

हेमंत पाटील रॉयल्स: 20 षटकांत 8 बाद 163 धावा (सायली लोणकर नाबाद 70(36,9×4,2×6), पुनम खेमनार 34(25,5×4,1×6), सोनल पाटील 13(19), तनुजा भोसले 2-26, सिमरन चौधरी 2 -32) वि.वि चंद्रोज्: 20 षटकांत 5 बाद 131 धावा (साक्षी वाघमोडे नाबाद 72(55,6×4,3×6), आरती सुनील बहेनवाल नाबाद 16(20,1×4), पुनम खेमनार 2-22, प्रज्ञा वीरकर 1-13) सामनावीर- सायली लोणकर

हेमंत पाटील रॉयल्स संघाने 32 धावांनी सामना जिंकला

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading