Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

पुणे महापालिकेतील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पहिला वर्धापन दिन साजरा

पुणे: पुण्यनगरीच्या मा उपमहापौर सौ सुनीता परशुराम वाडेकर यांच्या प्रयत्नातून पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा गेल्यावर्षी १९ डिसेंबर रोजी बसविण्यात आला होता आज १९ डिसेंबर रोजी पुतळा बसून एक वर्ष पूर्ण होत आहेत या पहिल्या वर्षाच्या वर्धापन दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला फुलांचे सुशोभीकरण मा.उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांच्या माध्यमातून करण्यात आले.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे हयात असताना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून पुणे महापालिकेने त्यावेळेसच्या पक्ष संघटनांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा पुणे महानगरपालिकेच्या वतीने सन्मान करायला पाहिजे होता तशा पद्धतीचा ठराव देखील पालिका सभेमध्ये आला असता त्यावेळेसच्या सत्ताधारी पक्षाने बाबासाहेबांच्या सन्मानाला विरोध केला ही घटना त्या काळातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या होत्या खूप बाबासाहेबांचा सन्मान मुंबई महापालिकेने केला होता परंतु पुणे महापालिकेने बाबासाहेबांचा सन्मान केला नाही भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचा सन्मान होणे गरजेचे होते परंतु का केला नाही हा प्रश्न आजही आंबेडकरी जनतेच्या मनामध्ये प्रलंबित आहे परंतु आज पुणे महापालिकेमध्ये आंबेडकरी चळवळीचे रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निवडून आल्यानंतर उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांच्या अथक प्रयत्नानंतर व सत्ताधारी भाजप पक्ष यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा पुतळा पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर बसविण्यात आला ही ऐतिहासिक कामगिरी उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या प्रयत्नातून झाल्यामुळे आम्हाला याचा खूप अभिमान आहे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुणे महापालिकेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना प्रेरणादायी ठरत आहे पुढच्या वर्धापना निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचा मनोदय  सुनिता परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे राज्याचे संघटन सचिव परशुराम वाडेकर ,शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण ,प्रदेश सदस्य अँड.मंदार जोशी अँड.अर्पिताताई जोशी बसवराज गायकवाड,अविनाश कदम,विष्णू कदम महापालिकेतील अनेक कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading