जिल्हास्तरीय डेडलिफ्ट स्पर्धा शनिवारी
पुणे : हौशी पॉवरलिफ्टिंग संघटना पुणेच्या वतीने डेडलिफ्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १७ ते १८ डिसेंबर दरम्यान औंध बाणेर लिंक रस्त्यावरील जनरेशन हेंच जिम्नॅशियम येथे ही स्पर्धा होणार आहे.
ही स्पर्धा सब ज्युनिअर, ज्युनिअर, सिनिअर, मास्टर्स पुरुष आणि महिला गटात होणार आहे. यात स्ट्रॉंग पुरुष आणि महिला हे ‘किताब दिले जाणार आहेत. स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ रविवारी दिनांक १८ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे.
देवधर क्लासेचे संदीप देवधर, न्यूक्लियस न्यूट्रिशनचे श्रीपाद चव्हाण यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. स्पर्धेत १५० पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत.
