fbpx

तमाम शिवप्रेमींच्या वतीने 13 डिसेंबर 2022 रोजी ‘पुणे बंद’ची घोषणा…

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की प्रत्येक जाती धर्माचा माणूस छत्रपतींना सन्मानाने आदराने एकत्र येतात, खरंतर छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांची सर्वोच्च प्रेरणा आहे. परंतु भाजप व आरएसएस च्या वतीने वारंवार छत्रपतींचा अवमान होतो, ही बाब महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत निंदणीय आहे. महाराष्ट्राचे घटनात्मक प्रमुख राज्यपाल भगतसिंह कोशारी आरएसएसची काळी टोपी घालून शिवरायांचा वारंवार अवमान करतात. बहुजन महापुरुषांचा अवमान करतात. तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शिवरायांचा अवमान करतात, याचा अर्थ ती पक्षाची भूमिका असावी. प्रसाद लाड, मंगल प्रभात लोढा व रावसाहेब दानवे ही सुद्धा भाजपचेच लोकप्रतिनिधी आहेत, हा योगायोग नाही. याचा अर्थ ‘छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ… ही फक्त बदनामी अवमान आणि अवहेलना करण्यासाठीच. शिवरायांचा वापर केला जात आहे.

ज्या व्यवस्थेने छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र ठरवलं, तीच व्यवस्था साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा आज छत्रपतींचा अवमान करते हे दुःखद आहे. मात्र शिवप्रेमी म्हणून आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वच आहेत. जर कोणी दीड दमडीचा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करत असेल तर शिवप्रेमी शांत बसणार नाहीत. म्हणून या सगळ्या वाचाळवीरांची हकालपट्टी करावी. यांच्यावर कठोर शासन करावं आणि यापुढे जर कोणी छत्रपती शिवरायांची बदनामी केली तर अशांना याच पुण्यातील शिवप्रेमी जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाहीत… अशी ठाम भूमिका आज तमाम शिवप्रेमींच्या वतीने घेण्यात आली आणि एकमुखी 13 डिसेंबर 2022 रोजी सर्वानुमते पुणे बंद चे पुणेकरांना आवाहन करण्यात आले.

एक दिवस छत्रपतींसाठी,..
छत्रपतींच्या सन्मानार्थ, आम्ही सारे मैदानात…

पुण्यातील सर्व जाती धर्मातील, तमाम शिवप्रेमी पुणेकरांच्या वतीने आज सर्वपक्षीय बैठक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, एस एस पी एम एस शिवाजीनगर, पुणे या ठिकाणी घेण्यात आली.

यावेळी या बैठकीस संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, जनता दल, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, मुस्लिम बांधव, मातंग समाजातील बांधव तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारे सर्व जाती धर्मातील महिला व पुरुष मंडळी उपस्थित होती.

यावेळी बैठकीस अरविंद शिंदे, प्रशांत जगताप, संतोष शिंदे, संजय मोरे, गजानन थरकुडे, बाळासाहेब अमराळे, सचिन आडेकर, अविनाश मोहिते, रवींद्र अण्णा माळवदकर, दत्ता सागरे, प्रशांत धुमाळ, अजय कुमार जगताप, विवेक तुपे, भिमराव कांबळे, अंजुम इनामदार, फिरोज मुल्ला, दत्ता पोळ, मुकेश यादव, नीता अडसुळे, रोहिदास तोडकर, मंदार बहिरट, चंद्रशेखर गाडगे, संदीप लहाने, महेश टिळे, सनी थोपटे, रोहन पायगुडे, आदी शिवप्रेमी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: