पुणे शहर माजी महापौर संघटनेतर्फे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध
पुणे :छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जो अवमानन केला त्याचा निषेध करण्यासाठी पुणे शहरातील माजी महापौर व माजी उपमहापौर यांनी आज सकाळी गणेश खिंड रोडवरील राजभवन समोर धरणे धरून कोश्यारी यांच्या विरोधात घोषणा दिल्या. जोपर्यंत कोश्यारी महाराष्ट्रातून जात नाहीत तोपर्यंत त्यांच्या विरोधात हे आंदोलन चालू राहील असे यावेळी उपस्थित महापौरांनी सांगितले. या धरणे कार्यक्रमात श्री अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, सौ कमलताई व्यवहारे, सौ राजलक्ष्मी भोसले, सौ वैशाली बनकर, सौ रजनी त्रिभुवन,सौ कमलताई ढोलेपाटील, प्रशांत जगताप, दत्तात्रय गायकवाड ,बाळासाहेब शिवरकर,दीपक मानकर, निलेश मगर, निलेश निकम, उदय महाले, महेश हांडे, राजेश साने,सुकेश पासलकर इत्यादी सहभागी झाले होते.
