पुणे महापालिकेच्या रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्त पदावर विकास ढाकणे यांची नियुक्ती
पुणे:पुणे महापालिकेच्या रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्त पदावर महापालिकेच्या सेवेतीलच अधिकाऱ्यांची वर्णी लागणे अपेक्षीत असताना या पदावर भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील अधिकारी विकास ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदाच्या तीन जागा आहेत. ती जागा आहे. त्यापैकी एका जागेवर सेवा ज्येष्ठतेनुसार महापालिकेच्या सेवेतील अधिकाऱ्यास या पदावर पदोन्नती दिली जाते. यापूर्वी सुरेश जगताप, ज्ञानेश्वर मोळक आणि विलास कानडे हे तिघांची या पदावर नियुक्ती झाली होती. दरम्यान सप्टेंबर महिन्यात विलास कानडे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त होते. या पदासाठी शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, व्ही.जी. कुलकर्णी, पीएमआरडीए येथे प्रतिनियुक्तीवर असलेले विवेक खरवडकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर यांची नावे चर्चेत होती. त्यांचा अंतरिम अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला असून, विभागीय चौकशी अहवाल आणि गोपनीय अहवाल शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू होती. रेल्वे सुरक्षा सेवेतील विकास ढाकणे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केल्याचा आदेश राज्य नगरसचिव विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी काढले आहेत. ढाकणे यांनी शुक्रवारी महापालिकेत हजर होऊन या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ढाकणे हे पावणे दोन वर्ष पिंपरी चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्त होते. कोरोनाच्या काळात त्यांनी तेथे आरोग्य सेवा देण्यासाठी विशेष काम केले.
