Thursday, August 27, 2026
BusinessLatest News

वी बिझनेसने सुरु केले ‘वी सिक्युअर’ – उद्योगव्यवसायांसाठी सायबर सिक्युरिटीचा सर्वसमावेशक पोर्टफोलिओ

पुणे : अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या डिजिटल युगामध्ये कामाचा जास्तीत जास्त भार क्लाऊडवर सोपवला जात आहेइंडस्ट्री ४.० मुळे ऑटोमेशनमध्ये क्रांती घडून येत आहे आणि डिजिटल वर्कफोर्समध्ये वाढ होत आहेत्यामुळे व्यवसायांना सायबर धोके आणि हल्ले यांचा धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. सूक्ष्मलघु आणि मध्यम उद्योगांकडे माहितीतयारी आणि संसाधने यांची वानवा असतेत्यामुळे त्यांना टार्गेट केले जाण्याची शक्यता खूप जास्त असते. व्यवसायांच्या व ग्राहकांच्या सुरक्षेसाठी सर्वसमावेशक सुरक्षा सुविधा पुरवल्या जाणे ही काळाची गरज आहे.

गरज आणि उपलब्धता यांच्यातील अंतर दूर व्हावे यासाठीवोडाफोन आयडिया लिमिटेड या आघाडीच्या टेलिकॉम कंपनीच्या वी बिझनेस या एंटरप्राइज विभागाने वीTM सिक्युअर हा सायबर सुरक्षा सेवासुविधांचा सर्वसमावेशक पोर्टफोलिओ सादर करत असल्याची घोषणा केली आहे.  यामध्ये विश्वसनीय सुविधांची श्रेणी आहे ज्यामध्ये नेटवर्कक्लाऊड आणि एन्ड पॉईंट्समध्ये उद्भवणाऱ्या विविध धोक्यांविरोधात संरक्षण प्रदान केले जाते.

आज भारताच्या जीडीपीमध्ये सूक्ष्मलघु आणि मध्यम उद्योगांचे योगदान ३०% असून देखील डिजिटल तंत्रे व प्लॅटफॉर्म्स यांचा स्वीकार करण्यासाठी त्यांची पुरेशी तयारी झालेली नाही. आपल्या व्यवसाय संचालनाला सायबर हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी त्यांनी अद्याप केलेली नाही. ५२% हुन जास्त भारतीय सूक्ष्मलघु आणि मध्यम उद्योगांनी अजूनही क्लाउडवर आधारित सुरक्षा सेवाअँटीव्हायरस सॉफ्टवेयरक्लाऊड फायरवॉल्सव्हीपीएनक्लाऊड कनेक्टएन्ड-टू-एन्ड डेटा एन्क्रिप्शन किंवा मॅनेज्ड सिक्युरिटी सेवा यांची अंमलबजावणी केलेली नाही असे वी बिझनेसच्या “रेडीफॉरनेक्स्ट” एमएसएमई सर्व्हे निष्कर्षांमध्ये आढळून आले आहे. या माहितीवरून असेही दिसून येते कीज्या सूक्ष्मलघु आणि मध्यम उद्योगांनी सुरक्षा सुविधा स्वीकारल्या आहेत त्यांची डिजिटल परिपक्वता ज्यांनी त्या सुविधा स्वीकारलेल्या नाहीत अशा व्यवसायांपेक्षा सरासरी १.६ पट जास्त आहे.

श्रेणीतील सर्वोत्तम व्यवसाय सुविधा पुरवण्याच्या सहयोगात्मक दृष्टिकोनाला अनुसरूनवी बिझनेसने आपल्या व्यवसाय ग्राहकांना भविष्यातील व्यवसाय संचालनासाठी अनुरूप ठरेल अशा पद्धतीने प्रत्येक गंभीर आणि महत्त्वपूर्ण पैलू सुरक्षित राखला जाईल असे सायबर सुरक्षा सुविधांचे सर्वसमावेशक पॅकेज पुरवण्यासाठी जागतिक पातळीवरील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे.

वीचे चीफ एंटरप्राइज बिझनेस ऑफिसर अरविंद नेवातीया यांनी सांगितले,”सायबर सुरक्षा व्यवस्था मजबूत असणे ही कोणत्याही व्यवसायाची खूप महत्त्वाची गरज आहे. खासकरून आजच्या डिजिटल युगामध्ये ही बाब अत्यावश्यक आहे.  सायबर धोक्यांची वारंवारता आणि प्रमाण खूप जास्त वाढले आहेत्यामुळे कंपन्यांना अशा मजबूत सुरक्षा सुविधा हव्या आहेत ज्या त्यांच्या संपत्तीचे रक्षण करू शकतीलतसेच अगदी शेवटपर्यंतच्या युजरची प्रायव्हसी देखील अबाधित राखली जाईल. वीच्या नेटवर्क सुरक्षा नैपुण्याचा लाभ घेऊनआघाडीच्या सुरक्षा पुरवठादारांसोबत सहयोगातून आम्ही आमच्या सुविधा डिझाईन केल्या आहेतज्यामुळे व्यवसाय ग्राहकांना उद्योगक्षेत्रातील आघाडीच्या क्षमतांच्या एका व्यापक सूटचा लाभ घेता येतो ज्यामुळे त्यांच्या सायबर सुरक्षेशी संबंधित सध्याच्या व भविष्यातील गरजा पूर्ण होऊ शकतील.”

सायबर सुरक्षेशी संबंधित सर्व गरजा एकाच ठिकाणी पूर्ण होतील असे एक सर्वसमावेशक सोल्युशन पुरवण्यासाठी वी बिझनेसने फर्स्टवेव क्लाऊड टेक्नॉलॉजी (पॉवर्ड बाय सिस्को) आणि ट्रेंड मायक्रो यांच्या सहयोगाने वेब सिक्युरिटीई-मेल सिक्युरिटी आणि मॅक्झिमम डिव्हाईस सिक्युरिटी सोल्युशन्स अशा नव्या सुरक्षा उपाययोजना सादर केल्या आहेत.  यामध्ये क्लाऊड फायरवॉलमॅनेज्ड सिक्युरिटी सर्व्हिसेससिक्युअर डिव्हाईस मॅनेजर आणि मॅनेज्ड डीडीओएस सोल्युशन्स या प्रमुख सुविधा फोर्टीनेटआयबीएम आणि नेटस्काऊट अर्बोर यांच्या सहयोगाने उपलब्ध करवून देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading