Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने अवयव दानाविषयी सामाजिक जागृती अभियान

पुणे : 27 नोव्हेंबर 22 रोजी झालेल्या अवयवदान दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे शाखेतर्फे 4 डिसेंबर 22 रोजी दुपारी 3-30 ते 5-30 या वेळेत अवयवदान जनजागृती कार्यक्रम डॉ. संचेती सभागृह, आय एम ए हाऊस, टिळक रोड, पुणे येथे आयोजित केला आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर मुरलीधरजी मोहोळ आहेत. या अनुषंगाने अवयव दान एक चळवळ या विषयावर  जनसामान्यांसाठी   पथनाट्य, नृत्य नाटिका भारूड एकपात्री प्रयोग स्पर्धा तसेच विविध तज्ञ डॉक्टरांकडून विशेष चर्चा सत्र आयोजित केले आहे.

अवयवदात्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता, अवयवरोपण झालेल्या रुग्णांचे अनुभव कथन व जनसामान्यांचे शंकानिरसन असा कार्यक्रम असून अधिकाधिक लोकांनी अवयवदानाचा संकल्प करावा हा आय एम ए पुणेचा उद्देश आहे. इतरांचे जीव वाचवण्यासाठी अवयवदान हे अमूल्य दान आहे. तरी सर्वानी विशेषत: महाविद्यालयीन शिक्षक व विद्यार्थ्यानी जरूर उपस्थित रहावे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading