Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली अर्पण

पुणे: ज्येष्ठ साहित्यिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. डॉ.कोत्तापल्ले विद्यापीठाच्या सेवेत मराठी विभागात प्राध्यापक तसेच विभागप्रमुख म्हणून १९९६ ते २००५ पर्यंत कार्यरत होते. त्यांच्या विचारांचा अंगीकार करून आपण त्यांचे विचार पुढे नेऊ हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे मराठी विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर देसाई यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी कुलगुरू डॉ. कारभारी काळे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, वित्त व लेखाधिकारी चारुशीला गायके, विविध विभागांचे विभागप्रमुख, प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading