छगन भुजबळ विरोधी पक्षात आहेत, त्यांच्याकडे काहीही काम उरलेले नाही – गोपीचंद पडळकर
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी मंत्री छगन भूजबळ यांनी काही दिवसापूर्वी सरस्वती मातेवर टीका केली होती.शारदामाता आणि सरस्वती मातेचा फोटो हवा कशाला. असे वादग्रस्त वक्तव्य छगन भूजबळ यांनी केले होते.
छगन भुजबळ यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. ते विरोधी पक्षात आहेत, त्यांच्याकडे काहीही काम उरलेले नाही.अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना केली आहे.
छगन भुजबळ त्यांच्या पद्धतीने भूमिका मांडत असतात. पण लोकांच्या भावना महत्वाच्या आहे. छगन भुजबळ सध्या विरोधी पक्षांमध्ये त्यांच्याकडे काहीच काम शिल्लक नाही, राज्यात गदारोळ निर्माण होण्यासाठीच भुजबळ अशी विधान करीत असतात. असे पडळकर म्हणाले.
पडळकर म्हणाले,एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि भूमिका सरकारी दरबारी मांडणार आहे. विद्यार्थ्यांना भेटल्याशिवाय त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय त्यांचे प्रश्न कळणार नाहीत.
सध्याच्या सरकारने एमपीएससी विद्यार्थ्यांचे विषय सकारात्मक घेतले आहेत. शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून विद्यार्थ्यांच्या अनेक नियुक्त्या दिल्या आहेत. येत्या मंगळवारी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना घेऊन मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार आहे. असे पडळकर म्हणाले.
