Thursday, May 28, 2026
BusinessLatest News

actyv.ai ची अ‍ॅक्सिस बँकेसह एमएसएमईजना लागणाऱ्या वित्त सुविधा पुरवण्यासाठी भागिदारी

मुंबई  – actyv.ai या एआय- पॉवर्ड एंटरप्राइज सास प्लॅटफॉर्मने आज भारताच्या खासगी क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाच्या अ‍ॅक्सिस बँकेची भागिदारी जाहीर केली असून त्याअंतर्गत एमएसएमई ग्राहकांना साखळी पुरवठ्याशी संबंधित बँकेच्या वित्त सेवा पुरवल्या जाणार आहेत. या भागिदारीमुळे कॉर्पोरेट अँकर्स, डाउनस्ट्रीम डीलर्स आणि ट्रेडिंग भागिदारांना बँकेच्या साखळी पुरवठा वित्त सुविधा मिळवणे शक्य होणार आहे.

‘भारतातील लघु आणि मध्यम उद्योगांना शाश्वत पद्धतीने कर्ज मिळवण्यात खूपदा आव्हानांचा सामना करावा लागतो. actvy.ai ने अ‍ॅक्सिस बँकेसह केलेल्या भागिदारीअंतर्गत आम्ही आमच्या तंत्रज्ञान कौशल्याचा वापर करून एमएसएमई ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय ठेवले आहे. आम्हाला खात्री आहे, की डिजिटल प्लॅटफॉर्मची मदत, तंत्रज्ञान साधनांची उपलब्धता, परवडणारे कर्ज यांच्या सहाय्याने या क्षेत्रात विकास घडवणे शक्य होईल,’ असे actyv.ai.चे संस्थापक आणि जागतिक सीईओ रघू सुब्रमण्यम म्हणाले.

साखळी पुरवठा यंत्रणेच्या केंद्रस्थानी डिजिटल रुपांतरण असून तंत्रज्ञानावर भर, डेटावर आधारित निर्णय आणि उंचावलेला ग्राहक अनुभव हे त्याचे महत्त्वाचे घटक आहेत. actyv.ai आणि अ‍ॅक्सिस बँक यांच्यातील सहकार्यामुळे एमएसएमईज आणि त्यांच्या ट्रेडर्सच्या आर्थिक गरजा सुरळीत होण्यास मदत होईल.

या भागिदारीविषयी अ‍ॅक्सिस बँकेचे रिटेल लेंडिंग आणि पेमेंट्स विभागाचे समूह कार्यकारी प्रमुख सुमीत बाली म्हणाले, ‘पुढील काही वर्षांत पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्यासाठी देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यात एमएसएमई क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल यावर आमचा ठाम विश्वास आहे. actyv.ai सह केलेली भागिदारी विस्तृत एमएसएमई वर्गाला कर्ज सुविधा पुरवण्याच्या आणि त्यांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading