fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडी राज्यपालांचा निषेध करणार

मुंबई. 19 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची महत्वपूर्ण बैठक आज, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विधानभवनातील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, आदित्य ठाकरे, दिलीप वळसे पाटील, एकनाथराव खडसे, हसन मुश्रीफ, अनिल परब, सुनील प्रभू, अजय चौधरी, शशिकांत शिंदे, भाई जगताप, सचिन अहिर, सुरेश वरपुडकर, अमिन पटेल,अनिल पाटील, बाळाराम पाटील, अबू आझमी, कपिल पाटील, रईस शेख आदी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य उपस्थित होते. यावेळी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात देखील उमटण्याचे चिन्ह दिसत आहेत. आज महाविकास आघाडीच्या गटनेत्यांच्या बैठकीनंतर अधिवेशनात राज्यपालांचा निषेध केला जाणार असल्याचा इशारा, महाविकास आघाडीचे नेत्यांकडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading