Thursday, May 28, 2026
BusinessLatest News

टॉर्क मोटर्सने आपल्या पहिल्या अनुभव केंद्राचे पुण्यात उद्घाटन केले.

पुणे : भारतातील पहिली आणि वेगाने वाढणारी इलेक्ट्रिक मोटर सायकल उत्पादक टॉर्क मोटर्स ने आज भारतात आपले पहिले वहिले अनुभव केंद्र सुरू केले. हे नवीन केंद्र क्रांतिकारी ‘क्रेटोस’च्या एक पेक्षा जास्त चाचणी राइड च्या पर्यायांसह सर्व उपलब्ध रंग प्रदर्शित करेल. पुण्यातील विधी महाविद्यालयाजवळ स्थित हे केंद्र अतुलनीय विक्री आणि विक्रीनंतरच्या अनुभवाच्या वाढत्या आवश्यकतांची पूर्तता करेल.

आमच्या मौल्यवान ग्राहकांना एक भिन्न मालकी अनुभव देण्याच्या आमच्या ध्येयसाठी हे नवीन केंद्र डिजिटल आणि भौतिक दोन्हीचे उत्कृष्ट एकीकरण प्रदान करेल. हे आधुनिक स्वरूप ग्राहकांसाठी अत्याधुनिक संकल्पना आणि डिझाईनसह, प्रतिभावान कामगारांच्या टीमसह, एक समृद्ध मालकी अनुभव निर्माण करेल.

यावेळी टॉर्क मोटर्स चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.इ.ओ) श्री. कपिल शेळके म्हणाले की, “आम्ही आमच्या ग्राहकांना पुण्यातील पहिल्या वहिल्या  टॉर्क अनुभव केंद्राची ओळख करून देताना खूप उत्सुक आहोत. पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरातील टॉर्क च्या ग्राहकांना एक अनोखा अनुभव देण्यासाठी या  केंद्राची रचना करण्यात आली आहे. हे शोरूम आपल्या ग्राहकांना समकालीन वैशिष्ट्यांसह डिजिटल आणि भौतिक या दोन्हींच्या परिपूर्ण मिश्रणाचा अनुभव देईल. हे उद्घाटन आमचे धोरणात्मक दृष्टिकोन साध्य करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे; कारण ते व्यवसायाच्या भविष्यासाठी आउटलेट चा एक उत्तम नमूना म्हणून देखील काम करेल. भविष्यात, देशातील ‘‘क्रेटोस’ची वाढती लोकप्रियता आणि मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही असे अनुभव केंद्र इतर शहरांमध्ये सुद्धा चालू करू.”

टॉर्क मोटर्स ने त्यांचे पहिले उत्पादन – ‘‘क्रेटोस’ आणि ‘‘क्रेटोस-आर’या वर्षी जानेवारी मध्ये बाजारात आले. ‘‘क्रेटोस’ची किंमत रू. १,२२,४९९ (आधीच्या शोरूम मध्ये महाराष्ट्रात सबसीडी नंतर) आणि ‘‘‘क्रेटोस-आर’ची किंमत रू. १,३७,४९९  (आधीच्या शोरूम मध्ये महाराष्ट्रात सबसीडी नंतर) आहे. ग्राहक ‘क्रेटोस’ आणि ‘‘क्रेटोस-आर’ आमच्या कंपनी च्या अधिकृत वेबसाइट – www.booking.torkmotors.com  वरून बूक करू शकतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading