Thursday, May 28, 2026
ENTERTAINMENTLatest News

होम मिनिस्टरचे नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला

होम मिनिस्टर सासूबाई खास सुनबाई झकास !

आयुष्यात आपल्याला आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलं काय किंवा आईला आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलं काय, एकदा मुलगी सून झाली की तिच्यासाठी आपली आई सासूच असते. सासूची आई होणं तसं दुरापास्तच. अशाच एका खोडकर सुनेच्या आणि तिच्या खोडीवर कुरघोडी करणाऱ्या खट्याळ मिश्किल सासू मधल्या नात्याची खुमासदार गोष्ट म्हणजे “अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई” आजच्या आधुनिक काळात, सासू सूने मधील नातं, एकमेकींशी कधी भांडत तर कधी एकमेकींना चिमटे काढत कसं बहरत जातं, याचा धमाल प्रवास  २१ डिसेंबर ला येणाऱ्या झी मराठीवर येणाऱ्या “अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई” या नवीन मालिकेत बघायला मिळेल. याच थिमवर आधारित ‘होम मिनिस्टरच’ नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आल आहे. या पर्वात सासू सुनेतील नातेसंबध, मजेशीर किस्से प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत.

तेव्हा  पाहायला विसरू नका “होम मिनिस्टर” सोमवार ते शनिवार संध्या. ६ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading