fbpx

मी पालकमंत्री म्हणून पुन्हा बसणारच -अजित पवार

पुणे: अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री होते. मात्र आता सरकार बदललं असून भाजपनेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आली असून पुण्याचे कारभारी आता चंद्रकांत पाटील आहेत. त्यातच आज अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत विधान करून लक्ष वेधलं आहे.तुम्ही पालकमंत्री असताना चंद्रकांत पाटील बैठकीला येत नव्हते. आता ते पालकमंत्री असताना तुम्ही बैठकीला येतात.अस विचारल्यानंतर की, जेव्हा लोक सांगतील की, आता विरोधी पक्षात आमदार म्हणून काम करा, त्यावेळी करायचं. ज्यावेळी सत्ताधारी पक्षाचा मंत्री आणि आमदार म्हणून काम करायच असेल. तेव्हा आपण पालकमंत्री म्हणून पुन्हा बसणारच आहोत, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

सीमा प्रश्नावर पवार म्हणाले, की, राज्य सरकारने जत पंढरपूरकडे लक्ष दिले पाहिजे. तिथल्या लोकांचे प्रश्न सोडवायला पाहिजे. तेथील लोकांना आपलेपणाची वागणूक मिळेल, असे प्रयत्न सरकारने करणे आवश्यक आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांचीही ही जबाबदारी आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कडक उत्तर दिले पाहिजे. एक इंच पण जागा त्यांच्याकडे जाता कामा नये. बेळगाव, निपाणी या गावांचे विषय न्यायालयात आहेत. सरकारने हा प्रदेश महाराष्ट्रात कसा येईल. ते बघणे गरजेचे आहे.असे अजित पवार म्हणाले.


मुख्यमंत्री शिंदे हे सर्व आमदारांना गुवाहाटी येथे घेऊन जाणार आहेत. तेथे देवीचे दर्शन घेणार असल्याबाबत विचारणा करण्यात आली असता, पवार म्हणाले, मला समजले आहे की, त्यांनी तेथील हॉटेल मालकाचे बिल दिले नाही. त्यामुळे हॉटेल मालकाने आत्महत्या केली. ही प्रसार माध्यमांमध्ये चर्चा होती. ते दर्शनाला चालले आहेत. तेथे रेडा बळी देतात. आता ते कोणाचा बळी द्यायला चाललेत. लोक नवस फेडायला जात असतात. दर्शनाला जाणार असतील, तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: