बी आर कुलकर्णी यांची रेल्वे पेन्शनर्स असोसिएशनच्या केंद्रीय समितीत सह- सचिवपदी नियुक्ती
पुणे : पुण्यातील निवृत्त रेल्वे अधिकारी बाळकृष्ण रामचंद्र कुलकर्णी यांची नुकतीच रेल्वे पेन्शनर्स असोसिएशन’च्या केंद्रीय समितीत सह-सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सिंकदराबाद येथील मुख्यालयात नुकत्याच संपन्न झालेल्या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नॅशनल फ़ेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेमन (एनएफआयआर) चे महासचिव डॉ. एम राघवैया आणि रेल्वे पेन्शनर्स असोसिएशन’चे महासचिव एस.एन.सी. रामकृष्णमचारी उलू यांच्या प्रमुख उपस्थितीत ही नियुक्ती करण्यात आली आहे.
कुलकर्णी हे पुणे रेल्वे विभागातील दौंड रेल्वे स्थानक येथे ३८ वर्षे कार्यरत होते. आपल्या सेवा काळात त्यांनी परिवहन निरीक्षक म्हणून माजी रेल्वेमंत्री नितीश कुमार, सुरेश प्रभू यांच्या दौऱ्यांच्या देखभाल व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली होती. त्यांना सुरक्षा विषयक विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी अखिल भारतीय रेल्वे सेवानिवृत्त संघटनेत विविध पदावर काम केले आहे.
