राज्यपाल जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना पुण्यात फिरू देणार नाही शिवसेनेचा इशारा
पुणे : राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्यातून त्यांनी माफी मागावी अशी मागणी होत आहे. विविध ठिकाणी आंदोलन पण सुरू आहे.राष्ट्रवादीच्या पाठोपाठ शिवसेनेने देखील आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ निदर्शने केली . आज पुण्यात शिवसेनेतर्फे अलका टॉकीज चौकासमोर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या विरुद्ध आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
या आंदोलनाला शिवसेनेचे गजानन थरकुडे,अनिल दत्ताञय माझिरे, संदिपभाऊ मराठे,संजय धापसे,सोपान पौळ,देविदास पवार व शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय मोरे म्हणाले,भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी तर एका वृत्तवाहिनीवर बोलताना छत्रपतींनी ओरंगजेबाची पाच वेळा माफी मागीतली होते असे नीच व अवमानकारक वक्तव्य केले. या वक्तव्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठराखण केली. सत्तेसाठी साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांचे तळवे चाटण्याची ही अतिशय लाचार प्रवृत्ती असून कोणताही स्वाभिमानी मराठी माणूस हे सहन करणार नाही. राज्यपालांनी केलेले वक्तव्य हे एकदम चुकीचे आहे. राज्यपाल जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना पुण्यात फिरू देणार नाही. असा इशारा संजय मोरे यांनी दिला.
