अनिल ठवाळ यांचे सिंचन भवन पुणे येथे प्राणांतिक उपोषण सुरू
पुणे : श्रीगोंदा कुकडी विभाग दोन चे कार्यकारी अभियंता काळे यांना पाच वर्षे झाली असून त्यांची तात्काळ बदली करावी व कुकडीच्या मुख्य वितरिका डी वाय १२ चारीच्या कामाला शासनाने प्रशासकीय मान्यता घ्यावी या प्रमुख मागण्यासह इतर मागण्यांसाठी कृष्णा खोरे महामंडळ पुणे कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असल्याची माहिती माजी जि. प. सदस्य अहमदनगर अनिल ठवाळ यांनी सांगितले.
पुढे माहिती देताना अनिल ठवाळ म्हणाले की श्रीगोंदा विभाग २ चे कार्यकारी अभियंता हे मुख्यालयात कधीच राहिले नाहीत. त्यांचे कामकाजाकडे दुर्लक्ष असते ते नागरिकांना भेटत नाहीत, त्यांची त्वरित कृष्णा खोरे महामंडळाबाहेर बदली करावी व डी वाय १२ चारीचा विशेष दुरुस्ती प्रस्ताव अस्तरीकरण व नलिमा वितरण प्रणाली प्रशासकीय मान्यता साठी 23/ 5/ 2022 ला सादर केला आहे त्यास मंजुरी द्यावी तसेच कुकडी कालवा १३८ ते १५८स्तरीकरणाच्या कामाचा आदेश होऊन सहा महिने झाले होऊनही एजन्सीने काम सुरू केले नाही त्यांचा कार्यारंभ आदेश रद्द करून त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी व एजन्सीला काळया यादीत टाकावे असे अनिल ठवाळ यांनी सांगितले यासह अन्य मागण्या घेऊन उपोषण करीत असल्याचे त्यांनी माहिती दिली. सदर उपोषणास प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी भेट देऊन सदर प्रकरणाची माहिती घेऊन त्यांच्या उपोषणास पाठींबा दर्शविला.यावेळी विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
