Sunday, October 25, 2026
Latest NewsPUNE

‘पद्मलता’ पुरस्कार मधुरा बडवे आणि निवेदिता मेहेंदळे यांना प्रदान !

पुणे: कीर्तन परंपरा 25 वर्षांहून अधिककाळ वृद्धिंगत करून कीर्तनाचा प्रचार आणि प्रसार केल्याबद्दल दिला जाणारा मानाचा ‘पद्मलता’ पुरस्कार हा सन २०२१ व २०२२ साठी अनुक्रमे ह भ प सौ.मधुरा बडवे आणि ह भ प सौ.निवेदिता मेहेंदळे यांना सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आला. महावस्त्र ,मानपत्र व दक्षिणा असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे यंदाचे ४थे वर्ष आहे. अशी माहिती ,कीर्तनकलानिधी ह भ प श्री. रामचंद्रबुवा भिडे यांनी दिली.

हा पुरस्कार वितरण समारंभ शनिवार दि 19 नोव्हेंबर रोजी सायं. 5.30 वा, : श्री नारद व्यास मंदिर,भिकारदास मारुती मंदिरामागे सदाशिव पेठ पुणे येथे संपन्न झाला. श्रीहरिकीर्तनोत्तेजक सभा,पुणेचे उपाध्यक्ष ह.भ.प. डॉ. विलासबुवा पटवर्धन यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले, मुंबईचे ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प.श्री. राजेंद्रबुवा मांडेवाल हे या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच यानंतर त्यांचे कीर्तन देखील संपन्न झाले. या वेळी योगेश देशपांडे (तबला) आणि साहिल पुंडलिक (हार्मोनियम) यांनी वाद्यसंगत केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading