Tuesday, June 23, 2026
Latest NewsPUNE

पुण्यात भगतसिंग कोश्यारी यांचा फोटो जाळून प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन

पुणे : प्रदेश काँग्रेस युवकच्या वतीने लाल महल पुणे येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा फोटो जाळून आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.याचा निषेध म्हणून प्रदेश काँग्रेस युवक व पुणे शहर काँग्रेस यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले असल्याचे प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी सांगितले.

पुढे बोलताना रोहन सुरवसे पाटील, राहुल शिरसाठ, बळीराम डोळे म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठच्या पदवी प्रदान कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे बद्दल पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. कोश्यारी हे आपल्या राज्याचे राज्यपाल आहेत.ते सतत महापुरुष यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य का करतात.महापुरुषांचा आदर्श आणि त्यांचे विचार घेऊन राजकारण समाजकारण केले जाते. हे त्यांना माहीत नाही का?राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने दिला आहे.
यावेळी पुणे शहर काँग्रेस उपाध्यक्ष ओंकार मोरे,सचिव अक्षय सागर, सुजित गोसावी, ऋनेश कांबळे, प्रसाद वाघमारे, गौरव बालांडे, अनिकेत अडसूळ आदी आंदोलन दरम्यान उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading