Tuesday, June 23, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महापुरुषांचं अवमान करणाऱ्या कोश्यारी प्रवृत्तीची हकालपट्टी करा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी


मुंबई – महापुरुषांचं वारंवार अपमान करून महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या प्रवृत्तीची हकालपट्टी करा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. वारंवार अवमानकारक वक्त्यव्य करून महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावण्याचा काम हे कोश्यारी यांनी केलं आहे. कोश्यारी ही प्रवृत्ती असल्याची टीका दानवे यांनी केली असून या प्रवृत्तीला ठेचल पाहिजे आणि आता ती वेळ आली असल्याचे ते म्हणाले. दिल्लीच्या बादशाहला खुश करण्यासाठी जर ते असे बेताल वक्तव्य करत असतील तर या प्रवृत्तीला ठेचावच लागेल. महाराष्ट्रातील जनता त्यांना परत घरी पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा घणाघणात अंबादास दानवे यांनी केला आहे.

या प्रवृत्तीला समर्थन पाठींबा देणार भाजप आहे. राहुल गांधींजींच्या वक्त्यावर आंदोलन केली जातात, मग छत्रपतींविषयी अवमानकारक वक्त्यव्य करणाऱ्या राज्यपालांविरोधात मिंदे सरकार रस्त्यावर का उतरत नाही? राज्यपालांना का विरोध करत नाही, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांचा अवमान करणं व महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का पोहचवणे हाच अजेंडा त्यांचा असल्याचं म्हणत दानवे यांनी भाजपवर तोंडसुख घेतलं.

छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, राजनीती, न्यायनीती, शेतकऱ्यांविषयीचे धोरण हे आजही महाराष्ट्राला देशाला नव्हे तर जगाला मार्गदर्शन करत आहेत. आज जगतिक स्तरावर यावर अमेरिका, इंग्लंड मधील विद्यापीठांमध्ये स्वतंत्र प्रकरण शिकवली जात असताना या राज्यपालांच्या डोक्यात कुठून प्रकाश पडला ते पुराने जमाने के आहे असं म्हणायला असा उपरोधिक सवाल दानवे यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुस्थानाचे दैवत आहेत. शिवाजी महाराजांचा विचार महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणारा आहे. त्यांना महामहिम म्हणावं की नाही असं लाजिरवाणे वक्त्यव्य कोश्यारी सतत करत असतात त्याचा निषेध आज आम्ही व्यक्त केला आहे. आम्हाला कितींदाही अटक झाली तर आम्ही घाबरणार नाही, अशी प्रतिक्रिया दानवे यांनी आंदोलनानंतर झालेल्या अटकेवर दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading