Tuesday, June 23, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे आवडते पंतप्रधान – खासदार सुप्रिया सुळे

पिंपरी : हल्ली विरोधकांनी सरकारचं कौतुक करणं ही खरंतर दुर्मिळ बाब मानली जाते. पण खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या कामांचं कौतुक केलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे आवडते पंतप्रधान आहेत. असा उल्लेख खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

सुप्रिया सुळे यांनी आज पिंपरी येथील मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या अधिवेशनात उपस्थित राहिले. तेव्हा त्यांनी भाषण केले.
विशेष म्हणजे राजकारणात आपल्याला मराठी संस्कृती देखील जपायची असल्याचं विधान देखील त्यांनी केलं. सुप्रिया सुळे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देखील दिली.
आमच्या छत्रपतींच्या विरोधात बोलणार असाल तर आम्ही खपवून घेणार नाही. चूक एकदा होऊ शकते. मात्र वारंवार करणे म्हंजे ती त्यांची चॉईस असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हर हर महादेव चित्रपटामध्ये चुकीच्या गोष्टी दाखवल्या गेल्या. भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी जे बोलले असा इतिहास कोणी वाचला का? यांना कोणी इतिहास कसा सांगत नाही”, अशा शब्दांत सुप्रिया यांनी संताप व्यक्त केला.
जर हे छत्रपती यांच्या विरोधात बोलले तर हे काहीही करू शकतात? छत्रपतींच्या विरोधात कोणीही बोलला तर आम्ही खपवून घेणार नाही. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार”, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.
“जर हे छत्रपती यांच्या विरोधात बोलले तर हे काहीही करू शकतात? छत्रपतींच्या विरोधात कोणीही बोलला तर आम्ही खपवून घेणार नाही. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार. अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.
उत्तर प्रदेशच्या जाहिराती महारष्ट्रामध्ये का देता? लढेंगे और जितेंगे. आम्ही कायमच सत्तेत राहायला काय मक्तेदारी घेतलीय? खोक्यांबद्दल मी बोलत नाही. नाहीतर पुन्हा काहीतरी व्हायचं. खोक्यांचं राजकारण मी करत नाही. असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading