संजय राऊत ज्यांना गुरू मानतात. त्या शरद पवारांचा इतिहास खंजिराचाच आहे -चंद्रकांत पाटील
पुणे:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली आहे. या भेटीआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता खोचक सल्ला दिला होता.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला हात जोडायला जात असाल, तर हातातील खंजीर बाजुला ठेवा. असा सल्ला राऊतांनी दिला होता. त्यावर संजय राऊत ज्यांना गुरू मानतात. त्या शरद पवारांचा इतिहास खंजिराचाच आहे. अशी टीका
भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांच्यावर केली.
सरकार अस्थिर होत चाललं आहे .असं विरोधक म्हणत आहेत. ते त्यांचं कामच आहे. त्यामुळे कार्यकर्ते चार्ज होतात असंही पुढे बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत त्यावर पाटील म्हणाले,शहरात आता वाहतूक कोंडी राहिलेली नाही. वाहतूक कोंडी ही मीडियाने तयार केलेली आहे. महापालिकेचे काम जोरदार सुरू आहे. वाहतूक कोंडीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
