विजय पुसाळकर पीवायसी प्रीमियर क्रिकेट लीग 2022 : टायगर्स, डायनोज, बॉबकॅट्स संघांचा दुसरा विजय
पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित नवव्या पीवायसी- विजय पुसाळकर प्रीमियर लीग क्रिकेट 2022 स्पर्धेत साखळी फेरीत टायगर्स, डायनोज, बॉबकॅट्स या संघांनी आपली विजयी मालिका कायम ठेवत दुसरा विजय नोंदविला.
पीवायसी क्लबच्या क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात मधुर इंगळहळीकर(नाबाद 27धावा), शुभंकर भाजेकर(29धावा) यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर टायगर्स संघाने डाऊनटाऊन संघाचा 7गडी राखून पराभव केला. दुसऱ्या सामन्यात प्रसाद जाधव(नाबाद 64धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर आर्यन स्कायलार्क्स संघाने पँथर्स संघाचा 8 गडी राखून पराभव केला. गंधार देशपांडे(नाबाद 46) याने केलेल्या फलंदाजीच्या जोरावर डायनोज संघाने चिताजचा 8 गडी राखून पराभव केला. अन्य लढतीत रोहन छाजेडने केलेल्या नाबाद 31 धावांच्या जोरावर गोल्डफिल्ड डॉल्फिन्स संघाने बुल्सचा 7 गडी राखून पराभव केला. अक्षय ओकच्या नाबाद 40 धावांच्या जोरावर लेपर्डस संघाने कोतवाल बदामीकर युनिकॉर्नचा 7 गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
डाऊनटाऊन: 6षटकात 5बाद 55धावा (कृष्णा मेहता 13, यश बोरवके 18(13,3×4), अमित कुलकर्णी 2-8, आशिष राठी 1-6) पराभुत वि. टायगर्स: 4.1षटकात 1बाद 59धावा (मधुर इंगळहळीकर नाबाद 27(11,1×4,3×6), शुभंकर भाजेकर 29(14,1×4,3×6), सोहन अनगळ 1-14); सामनावीर:- मधुर इंगळहळीकर; टायगर्स संघ 7गडी राखून विजयी;
पँथर्स: 6षटकात 2बाद 88धावा(कर्णा मेहता नाबाद 43(16,4×4, 3×6), अनुज मेहता नाबाद 25(10,1×4, 2×6), आर्यन देसाई 15, पार्थ किल्लेदार 2-10) पराभुत वि.आर्यन स्कायलार्क्स: 5.5 षटकात बिनबाद 89धावा (प्रसाद जाधव नाबाद 64(22,6×4,5×6), अंकुश जाधव नाबाद 20(14,1×4,1×6)); सामनावीर – प्रसाद जाधव; आर्यन स्कायलार्क्स संघ 8 गडी राखून विजयी.
चिताज: 6षटकात 1बाद 76धावा (विमल हंसराज नाबाद 37(18,2×4,3×6), गौरव सावगावकर नाबाद 20, प्रतीक वांगीकर 15) पराभुत वि. डायनोज: 5.5षटकात बिनबाद 77धावा (गंधार देशपांडे नाबाद 46(16,2×4,5×6), देवेंद्र चितळे नाबाद 25(19,2×4)); सामनावीर – गंधार देशपांडे; डायनोज संघ 8 गडी राखून विजयी;
स्टॅलियन्स: 6षटकात 3बाद 73धावा (सुमेध गांगल 33(17,5×4,1×6), केदार नाडगोंडे नाबाद 11(11), मिलिंद शाळगर 1-11) पराभुत वि. बेलवलकर बॉबकॅट्स: 5.5षटकात 4बाद 77धावा (आत्मन बागमार नाबाद 52(16,1×4,7×6), निल बेलवलकर 18, तन्मय चोभे 1-8, अभिजीत खानविलकर 1-24); सामनावीर – आत्मन बागमार; बॉबकॅट्स संघ 4 गडी राखून विजयी;
बुल्स: 6षटकात 3बाद 69धावा (समीर जोग 22(13,2×4,1×6), पराग चोपडा नाबाद 18, नकुल पटेल नाबाद 16, अभिजीत गानु 1-12, आशय कश्यप 1-11) पराभुत वि. गोल्डफिल्ड डॉल्फिन्स: 5.1षटकात 1बाद 71धावा (रोहन छाजेड नाबाद 31(16,5×4), अनुज साबडे 16, अभिजीत गानु नाबाद 11, समीर जोग 1-11); सामनावीर – रोहन छाजेड; गोल्डफिल्ड डॉल्फिन्स संघ 7 गडी राखून विजयी;
कोतवाल बदामीकर युनिकॉर्न: 6षटकात 5बाद 59धावा (क्षितीज कोतवाल 15, सिध्दार्थ बदामीकर 11, आयुष जगताप 11, नचिकेत जोशी 2-6, पार्थ सूर्दिकर 1-5, नकुल ओगले 1-12) पराभुत वि. लेपर्डस: 5षटकात 1बाद 63धावा (अक्षय ओक नाबाद 40(19,5×4,1×6), मंदार चितळे 11); सामनावीर – अक्षय ओक ; लेपर्डस संघ 7 गडी राखून विजयी.
