Tuesday, June 16, 2026
Latest NewsSports

आंतरशालेय १४ वर्षांखालील हॉकी स्पर्धा १८ नोव्हेंबरपासून

पुणे: लॉयला प्रशालेच्या माजी विद्यार्थी संघटना आणि लॉयल प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४ आणि १७ वर्षांखालील दुसऱ्या फादर शॉक आंतरशालेय हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद मैदानावर १८ नोव्हेंबरपासून ही स्पर्धा सुरु होईल.

लॉयला प्रशालेचे संस्थापक फादर रेव्हरंड फादर शॉक यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

ही स्पर्धा २०१८ नंतर प्रथमच घेण्यात येत आहे. सुरुवातीला ही स्पर्धा फरक्त १४ वर्षांखालील गटासाठी होती.

कोरोनाच्या संकटकाळानंतर पुन्हा या स्पर्धेला सुरुवात करताना १७ वर्षांखालील गटाचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

हॉकी महाराष्ट्राच्या अधिपत्याखाली स्पर्धेचे आयोजन होईल. स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी १५ नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. प्रवेशासाठी novembernitin@gmail.com या संपर्कस्थळाव संपर्क साधावा किंवा योगेश पागेदार (९८२२५०४२७३), श्रीधर कुलकर्णी (८२३७१२६७७१), श्रीधरन तंबा (९४२२३३८४४४), विवेक काळे (९६७३९९२९४४) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading