Friday, May 29, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

गजानन कीर्तिकर बाळासाहेबांची शिवसेनेच्या पुण्यातील संघटन बांधणीवर लक्ष केंद्रीत करणार

पुणे : शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग पुण्यात आहे. मला पुन्हा पुणे उभे करायचे आहे अशा शब्दात बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते व खासदार गजानन कीर्तिकर यांनी पुण्यातील संघटन बांधणीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सुचित केले. बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या युवा सेनेच्या वतीने कीर्तिकर यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. यावेळी कीर्तिकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे, महाराष्ट्र राज्य युवा सेना सचिव किरण साळी, अजय बापू भोसले व शहराचे उपप्रमुख व युवा सेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
स्वतःच्या हिमतीने जे कार्यकर्ते शिंदे गटात आले आहेत त्यांनी मला सांगितले की, तुम्ही आलात आम्हाला बळ मिळाले. पुण्यात शिवसेनेचा अवशेष राहीला नाही हा गैरसमज आहे. असे सांगत कीर्तिकर यांनी पुणे जिल्ह्यात संघटन बांधनीत लक्ष देणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading