Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

विनायक मेटे यांच्या गाडीच्या चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

पुणे : शिवसंग्रामचे प्रमुख आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट अपडेट समोर आली आहे. विनायक मेटे यांच्या गाडीच्या चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना दिले होते.
विविध सीसीटीव्हीचे फुटेज पाहण्यात आले आहेत, त्यावरुन सीआयडीने ही कारवाई केली आहे. एकनाथ कदम याला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे समजते.
विनायक मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी मेटेंच्या वाहन चालकावर संशय घेत त्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. विनायक मेटे यांचा चालक वेगवेगळा जबाब देतोय.असा आरोप मेटेंच्या भाच्याने केला आहे. मेटेंच्या चालकाने लोकेशन विचारलं त्याने उत्तर दिलं नाही.असा देखील आरोप केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading