Friday, May 29, 2026
ENTERTAINMENTLatest News

बिग बॉस मराठी – “तिला पण इग्नोर करायला तुम्हीच सांगितलं…” – विकास


“माणसं समोर जे बोलताता ते खरं नसतं” – किरण !

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये किरण माने आणि विकास आता कधीच बोलणार नाही असे एकंदरीतच चित्र समोर आले होते. पण त्यांच्यातील अबोला आता मिटला असून ते विकासला आज पटवून देताना दिसणार आहेत… माणसं समोर जे बोलताता ते खरं नसतं .

किरण माने विकासला सांगणार आहेत, माणसं समोर बोलतात ते खरं नसतं. तू म्हणतोस समोर येऊन मला बोलतात… अक्षय काय म्हणाला होता टॉप ५ मध्ये तू आहेस आणि नंतर काय म्हणाला हा मला नको खेळायला. आज टॉयलेटच काढलं. समोर बोलतात तसे नसतात, तेच अपूर्वाचं पण आहे, गोड म्हसका लावते आहे कि नाही? विकास म्हणाला, माहिती आहे मला…गोड म्हसका लावून, तिला पण इग्नोर करायला तुम्हीच सांगितलं ना मी इग्नोर करतो आहे… ती टास्कमध्ये पूर्ण मला म्हसका लावते. मी इग्नोर करायला लागलो आहे. किरण म्हणाले, हेच मला हवं होतो. दहा वेळा तू टाळल्यावर ११ वेळा येईल का तुझ्याकडे ? तू अक्षय बरोबर बोल, अमृता देशमुख बरोबर बोल, प्रसाद बरोबर बोल, रोहित बरोबर बोल, जी माणसं आपल्याला तोडायला निघाली आहे त्यांच्यासोबत बोलू नकोस.

पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading