देशातील पहिली युद्ध कौशल्य तालीम लहुजी वस्ताद साळवे यांनी सुरू केली – अजित पवार
पुणे :स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतीवीरांना विविध प्रकारचे शारीरिक धडे देण्यासाठी देशातील पहिली युद्ध कौशल्य व प्रशिक्षण देण्यासाठी क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी तालीम सुरू करून एक इतिहास केला असल्याचे मत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केले .करणतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतनिमित्त ,क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती च्या वतीने आयोजित पुरस्कार व का समारंभ प्रसंगी ते बोलत होते .
पुढे ते म्हणाले की ,महविकास आघाडी चे सरकार असताना मी अर्थमंत्री होतो तेव्हा लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे भूसंपादन केलं आता स्मारकाचे काम पूर्ण होत आहे .समाजाने आपल्या काही सूचना असतील त्या कराव्यात असे आव्हान ही त्यांनी केले .
यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते आंबदस दानवे म्हणाले की ,लहुजी वस्ताद साळवे यांनी त्यावेळी जगेन तर देशासाठी व मरेन तर देशासाठी अशी घोषणा केली होती .त्यांनी अनेक क्रांतिकारक घडवले होते .त्यांचा आज इतिहास समाजापर्यंत पोहचणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले यावेळी क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक संस्थेच्या कर्याअहवालाचे प्रकाशन करण्यात आले
.त्यांनतर अजित पवार व अंबादास दानवे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .यामध्ये माजी नगरसेवक अविनाश बागवे , भिमा कोरेगाव विजय स्तंभ समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे ,साधू तात्या थोरात ,रत्नप्रभा जगताप ,अश्विनी कदम , यासह विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला . या कार्यक्रमास क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती चे अध्यक्ष विजय डाकले,माजी मंत्री रमेश बागवे ,बाळासाहेब भांडे ,रवी पाटोळे ,शांतीलाल मिसाळ,यासह विविध मान्यवर उपस्थित होते .
